Red PURPLE BLACK

विशेष वार्ता

 लाईव्ह अपडेट :  शुभवार्ता >>  बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक -  दिनदूगीनी रात चौगुनी बढरही  पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>>  ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें  | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |


 

श्रीरामपूर

पाचवा दिवस 22 डिसेंबर - गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

पाचवा दिवस 22 डिसेंबर - गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

अध्याय 9 ,10 व 11

सावधान ही युगपरीवर्तनाची वेळ आहे, अज्ञान रूपी निद्रेतून जागा

 

श्रीरामपूर (दि.   ) वर्तमानकाळ हा अतिशय महत्वपूर्ण असून हा संधीकाळही आहे, ही परिवर्तनाची वेळ असून आपण आपल्यातील अज्ञानरूपी निद्रेतून जागे व्हा आणि वेळेचा सदुपयोग करा असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या पाचव्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषाबहनजी यांनी केले.

 

परमगुह्र ज्ञान स्पष्ट करतांना त्या म्हणाल्या की,  राजयोग हा अनेकानेक गोपनिय रहस्यांनी भरलेले परमगुह्र ज्ञान आहे. हे परमपवित्र ज्ञान आहे. कालचक्र, समयचक्र आणि सृष्टिचक्र हे निरंतर चालणारे आहे त्याचा न आदि आहे न अंत. युग परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे सृष्टिचा अंत नव्हे तर बदल होणे हा आहे. याअनुषंगाने त्यांनी सत्ययुग,त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाचे आधात्मिक रहस्य स्पष्ट केले.

 

सांप्रत वेळ ही युगपरिवर्तनाची वेळ असल्याबद्दल त्या म्हणाल्या की, समय तीव्र गतीने परिवर्तन होत आहे आणि तो संकेत देत आहे की आपणातही आंतरीक परिवर्तन होणे गरजेचे आहे. आणि जर आम्ही परिवर्तन नाही केले तर परिवर्तनच्या या चक्रात समय आपले काम चोख रितीने बजावेल तेव्हा मात्र पश्चातापा शिवाय काहीही राहणार नाही.

 

परमात्म्यास ओळखणा­यांची चिन्हे सांगतांना भगवान म्हणतात की, जो व्यक्ति ज्ञान अध्ययना बरोबर स्वत: योगयुक्त राहतो, दृढ़तापूर्वक पुरूषार्थ करतो, मोह पासून मुक्त राहतो, यज्ञ सेवा करतो, पापकर्मापासून शुद्ध होवून तोच मला ओळखू शकतो त्यायोग तो पवित्र स्वर्गधाम मध्ये जन्म घेतो. परमात्मा म्हणतात, हे अर्जुन कोणी जर मला फल-फूल वा काही ही श्रद्धेने दिले ते मी स्विकार करतो. अत: अर्जुन तू जी काही आराधना करीत आहे, मला समर्पित कर, गीतमध्ये अर्जुनास भगवान वारंवार, मला समर्पित कर असे म्हणतात याचे कारण वारंवार स्मृती जागृत केल्यानेच समपर्ण भाव उत्पन्न होतो. समपर्ण भाव अर्थात आंतरीक स्नेह.

 

परमात्म्यास सर्वसंबंधाने आठवण करा यासाठी त्याचा खरा मित्र बना त्यासाठी हवा मात्र खरा समपर्ण भाव, आणि तीच ख­या मैत्रीच प्रथम अट आहे. कोणत्याही अटी, शर्ती शिवाय असणारी ही मैत्री आपणास भरपूर बनविते. ख­या मैत्रीचे उदाहरण देतांना त्या विषयी त्या म्हणाल्या की जेव्हा एक साधारण सुदामा वर परमात्मा निस्सीम प्रेम करतात. सुदामा कडे केवळ मुठभर तांदूळ असतात, मात्र त्यात जो संपूर्ण समपर्ण भाव असतो त्यास तोड नसते, आणि हीच परमात्म्याशी खरी मैत्री असते.

 

 

परमात्मा आपल्या उत्पुत्ती विषयी म्हणतात की, न देवता न महर्षिगण त्यांची उत्पत्तिचे रहस्य ओळखतात, वि·ाात जेव्हा देवताच नव्हते, महर्षिगण ओळखत नव्हते. तेथे मनुष्यमात्रांची काय बिशाद. त्यासाठी भगवानने स्पष्ट शब्दात सांगितले की, मनुष्यआत्म्यांमध्ये जे विद्यमान गुण आहेत ते मी दिलेले आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही विशेषता दिलेल्या आहेत. त्या यासाठी की मानवाने त्यायोगे आपले जीवन अर्थपूर्ण बनवावे, त्या गुणांचा कधीही अभिमान करू नये. मी दिलेली ही सुंदर भेट सांभाळून न ठेता ती वाटत जावी. माझे एै·ार्य असीम आहे, मी गुणांचा भण्डार आहे, सर्वशक्तिमान आहे, मी सृष्टीचा आधी मध्य आणि अंत ओळखणारा आहे.  माझ्यात जसे सूर्याची प्रखरता आहे तशीच चंद्राची शितलता सूद्ध आहे. याप्रमाणे परमात्म्याचे वि·ारूप दर्शन आहे. भगवान आपल्या विराट रूपाचे दर्शन देऊन अर्जुनास स्तंभीत जसे करतात तसेच महाकालाचे दर्शनाने त्यास समयसूचकतेचा इशाराही करतात.

 

 

नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन