Red PURPLE BLACK

Articles

सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर - 2012

सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर - 2012

 alt

आंबेजोबाई - राष्टवादीच्या नेत्या मा खासदार सुप्रिया जी सुळे यांना राजयोग संदेश देतांना ब्रहमाकुमारी सुनिता, ब्रहमाकुमारी प्रिया आणि गोपाल भाई
alt

बार्शी : अमत महोत्सव संपन्न

बार्शीच्या आध्यात्मिक श्रावणबाळची कहाणी :
आईच्या गौरवार्थ त्याने केले तीन दिवशीय भव्य राजयोग शिबिराचे आयोजन

बार्शी : आपण श्रावणबाळची कथा एैकली असेल, आधुनिक जगात अनेक श्रावणबाळ सभोवताली पाहतोही परंतु आध्यात्मिक ज्ञानात एका श्रावण बाळाचे स्वरुप पहावयास मिळाले ते बार्शी येथे. आजीवन बालब्रहृाचारी कुमार जीवन जगणा­या मोहन भाइंनी आपल्या आईच्या गौरवार्थ एक भव्य राजयोग शिबिराचे आयोजन केले. अनेक लोकांना या राजयोग शिबिरातून परमात्म संदेश मिळून त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलली. या आध्यात्मिक श्रावण बाळाचे नाव आहे ब्र.कु. मोहन भाई आणि आईचे नाव आहे सुशीलाताई.

या आध्यात्मिक श्रावण बाळाची कहाणी येथेच थांबत नाही तर खास माऊंट आबू हुन ब्रहमाकुमारी गीता बहनजी यांनी या अमृतमहोत्सवात हजेरी लावली आणि उपस्थितंाना ज्ञानाने भरपूर केले.

ज्या आईने आपणास जन्म दिला तीच्या ऋणातून उतराई होण्याच्या थोडासा का होईना प्रयत्न मोहन भाईनी केला. तो एक मोठा आध्यात्मिक कार्यक्रमाच्यानिमित्ताने. सुशिलाताईंनी आपल्या नऊ कन्यांबरोबर मोहनभाईंना जन्म दिला आणि एकुलतेएक सुपूत्र मोहनभाईंनी आपले आयुष्य समर्पित जीवन जगून आध्यात्मिक सेवेसाठी वाहून घेतले आहे हे ही येथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते,   बाशी येथील या तीन दिवशीय कार्यक्रमात ब्रहमाकुमारी सोमप्रभा बहनजी, संगीता बहनजी यांनीही आपल्या मुखोद्गाराने उपस्थितंाना ज्ञानदान केले. यशवंतराव चव्हणभवनातील या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात विशेष म्हणजे ब्रहमाकुमारी गिता बहनजी (मा.आबू)यांचे समवेत दिलीपराव सोपल, रेवणसिद्ध शिवाचार्यजी परंडकर महाराज, दलितमित्र लोहारे गुरुजी, माजी आमदार विनायकराव पाटील, बाबूरावजी नरके राजसिंहभाई, विशेष फिनिक्स प्रांत अमेरिकेहून उपस्थितीत सविता बहनजी, बाशी सेवाकेंद्राच्या संगीता बहनजी, ओमप्रकाशजी बाफाना महानंदाबहनजी उदगीर, नंदाबहनजी लातूर, सुनिताबहनजी आंबोजोबाई आदि दिग्गज मंडळी आर्वर्जून उपस्थित होत्या.

या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल बार्शी सेवाकेंद्राचे परिसरात आणि जिल्ह्रात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. आपणही त्यांचे अभिनंदन करु शकतात त्यासाठी मोबाईल क्र 09850530669