लाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |
तृतीय दिवस 20 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला
राजयोग एक आध्यात्मिक यात्रा
श्रीरामपूर (दि. ) राजयोग म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा, अंर्तजगतची यात्रा, परमधामची यात्रा असून आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणे म्हणजेच राजयोग होय असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या तिसया दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या खया स्वरूपावर प्रकाश टाकला. राजयोगाद्वारे जगात शक्ति प्रकंपने प्रसारित केले जातात. राजयोग म्हणजे परमात्म्याशी केलेला सुसंवाद होय. ज्या प्रमाणे टेलिफोन वरील व्यक्ति शी आपण अदृश्य संवाद साधतो ती व्यक्ति आपणास दिसत नाही परंतु तीच्याशी आपण आपल्या संवेदना पोहचवू शकतो अगदी हेच तंत्र राजयोगाचे आहे परमात्मा निराकार आहे आणि आत्म्याचे स्वरूप सुद्धा निराकार आहे , निराकाराच्या माध्यमातून साधलेला हा एक प्रकारचा टेलिफॅथीक सुसंवाद आहे. परमात्म्याशी आपला माता-पिता, शिक्षक-विद्याथी, गुरू-शिष्य, असा संबंध येतो. मेडिटेशन म्हणजे काय, प्रार्थना, विचारशून्य अवस्था, प्राणायाम, मंत्र-जान, कल्पना म्हणजे मेडिटेशन आहे काय ? परंतू परमात्म्याशी खरा संबंध जोडणे अर्थात त्यास आत्मिक स्वरूपात आठवण करणे म्हणजेच मेडिटेशन अथवा राजयोग आहे.
या प्रसंगी त्यांनी उपस्थितांकडून राजयोग ध्यानाभ्यास करवून घेतला, परमशांतीचा अनुभव श्रोत्यांना या प्रसंगी झाला. राजयोगी ब्राहृाकुमारी उषा बहनजी यांनी राजयोगाचे प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर मनाच्या शांतीचा अनूभवाने अनेक जणांची ध्यानयात्रा लागली होती.