Red PURPLE BLACK

राजयोग गीता प्रवचन

राजयोग गीता प्रवचन

‘जीवन का आधार, गीता का सार’

 
सुख हे आत्म्याच्या चैतन्याची अनुभूती --राजयोगिनी उषादीदी 
 
रादेगो महाविद्यालय प्रांगणात उषादीदी यांचे गीता सार प्रवचन प्रारंभ*                  
 
 
अकोला-सर्व जण सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात .जगात अगदी धनाढ्य व्यक्तीही सर्व सुखे असून अस्वस्थ असल्याचे आपण बघतो .त्याला धन वैभवाचे सुख शांती देऊ शकत नसल्यामुळे तो बेचेंन व अस्वस्थ होतो .वास्तविक सुख हे दुसरे तिसरे काही नसून ती आपल्या आत्म्याची अनुभूती असल्याचे प्रतिपादन माउंट आबू येथील राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषादीदी यांनी केले .ब्रह्माकुमारी अकोल्याच्या वतीने उषादीदी यांचे जीवनाचा आधार -गीता सार या विषयावरील प्रवचनास शनिवार सकाळ पासून रादेगो महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात थाटात प्रारंभ झाला .या सोहळ्याचे प्रथम पुष्प उपस्थित साधकांना अर्पण करतांना त्यांनी राजयोग यांची माहिती दिली .कार्यक्रमाचा प्रारंभ उषादीदी ,आ. गोवर्धन शर्मा ,समाजसेवी नाना उजवणे ,उपमहापौर विनोद मापारी , माजी महापौर मदन भरगड ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख ,भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील ,राका महानगराध्यक्ष अजय तापडिया ,भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दलीपराज गोयनका ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान ,आयएमए चे  अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका ,कृष्णा साव ,ब्रह्माकुमारी रुक्मिणी दीदी ,माउंट आबू येथील विजय भाई  यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला .उषादीदी पुढे म्हणाल्या ,-राजयोगाचा संबंध सरळ परमात्याशी आहे .शरीर व आत्मा मिळून जीवात्मा निर्माण होतो. हा  जीवात्मा प्रारंभी निर्लेप व शुद्ध असतो कालांतराने त्याच्यावर चांगले वाईट संस्कार होऊन जीवात्मा त्या संस्कारांचे बरेवाईट फळ चाखतो .शरीराची रचना ही पंचतत्वापासून होते हे तत्व शरीरात सम प्रमाणात असले तरच शरीर स्वास्थ उत्तम राहते मात्र यातील एकाच तोल  बिघडला तर स्वास्थ बिघडून त्याचा परिणाम आपल्या चर्येवर होत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या . आत्मा हा प्रत्येक जीवधारीत आहे . कुणी म्हणतो तो शरीराच्या पोटात आहे तर कुणी छातीत आहे असे म्हणतो मात्र आत्मा हा शरीरातील इतर भागात न राहता तो केवळ आपल्या भ्रूकुटीत अर्थात दोन्ही डोळ्याच्या मध्यात असल्याचे दीदी यांनी यावेळी स्पष्ट केले .यामुळेच आपल्याकडे या भ्रूकुटीत तिलक लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .आत्मा हा सत-चित्त-आनंद व ज्योती स्वरूप आहे.तो सतोगुणी , ज्योतिस्वरूप असून या आत्म्याचे सात गुण आहेत .ज्ञान ,पवित्रता ,प्रेम ,शांती ,सुख , आनंद ,शक्ती हे ते गुण असून आत्म्याचे अधिष्ठान या गुणांवर असल्याचे त्यांनी या सत्रात सांगितले .या आत्म्याची वास्तविकताच मुळी ही शुद्धता व निर्मलतेवर आहे .त्याचा स्वभावच पवित्र व निर्मल आहे पण आपण जसजसे मोठे होते ही निर्मळता नष्ठ होत जाऊन मानवीय दुर्गुण स्वभावात निर्माण होतात व पवित्रता नष्ठ होते .यामुळेच मनात अशांतता व अस्वस्थता निर्माण होऊन त्याचा परिपाक जीवन अस्थिरतेच्या होत असल्याचे त्यांनी ऍनिमेटेड  स्लाईड चित्रफितीने स्पष्ट केले .संचालन व परिचय वर्षादीदी यांनी केले . या राजयोग प्रवचनास अगदी सकाळीही शेकडो महिला -पुरुष भाविकांनी प्रवचन स्थळी एकाच गर्दी केली होती.दि.१२ दिसे .पर्यंत सकाळी ७-३० ते सकाळी ९ वा पर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वा पर्यंत चालणाऱ्या या अद्भुत प्रवचनाचा लाभ घेण्याचे आहावान  ब्रह्मकुमारी अकोला-वाशिम तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कीर्ती नगर ,गांधी रोड, जुने शहर ,मलकापूर ,गोरक्षण शाखेच्या समस्त ब्रह्माकुमारी व ब्रह्मकुमार यांनी केले . 
 


महानगरात निघाली ब्रह्माकुमारी यांची शांती अनुभूती महायात्रा ब्रह्माकुमारी उषा दीदी यांचे  महानगरात उत्स्फूर्त स्वागत*            
 
 
 अकोला- प्रजापिता ब्रह्माकुमारी अकोल्याच्या वतीने शनिवार दि. १० डिसेंबर पासून स्थानीय रादेगो महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु होणाऱ्या माउंट आबू येथील राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषादीदी याच्या जीवन का आधार -गीता सार या अध्यात्मिक ऍनिमेटेड प्रवचनाच्या पूर्वसंध्येवर शुक्रवारी महानगरात भव्य शांती अनुभूती महायात्रा काढण्यात आली .आज गीता जयंतीच्या पर्वावर राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषादीदी महानगरात उपस्थित झाल्यात . त्यांच्या पावन उपस्थितीत प्रवचन प्रांगणातून दुपारी भव्य अनुभूती शोभायात्रा महानगरात काढण्यात आली.शेकडो कलशधारी मुली-महिलांच्या समवेत हि शोभायात्रा रादेगो महिला महाविद्यालयातून मोठ्या जल्लोषात महानगरात निघाली . .या शोभायात्रेचा प्रारंभ उषादीदी यांच्या हस्ते आकाशात शांतीचे प्रतीक असणारे पांढरे फुगे सोडून व  सौ.सुहासिनी धोत्रे  यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला .यावेळी नाना उजवणे , ब्रह्माकुमारी केंद्र प्रभारी रुक्मिणीदिदी  सुमन दीदी , वैशाली दीदी ,वर्षा दीदी ,अर्चना दीदी  आदी मान्यवर उपस्थित होते .आकर्षक रथात उषादीदी विराजमान होऊन शांतीचे प्रतीक झेंडे हातात घेऊन  शेकडो ब्रह्माकुमारी व ब्रह्माकुमारी या यात्रेत सहभागी झाले होते .दरम्यान रस्त्यावर अनेक सेवाभावी मंडळांनी उषादीदी यांचे स्वागत करून भव्य आतिषबाजी केली . ही शोभायात्रा नेहरू पार्क , खंडेलवाल भवन ,अशोक वाटिका ,सिविल हॉस्पिटल ,तहसील चौक ,गांधी मार्ग ,धिंग्रा चौक ,सिव्हिल  लाईन मार्गे परत रादेगो महिला महाविद्यालय प्रांगणात या शांती अनुभूती यात्रेचे थाटात समापन करण्यात आले .वाटेत आज सकाळी ७-३० वा प्रांगणस्थळी उषा दीदी यांच 

 उषा दीदी यांचा गीता सार प्रवचनास प्रारंभ होणार आहे .या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहून याचा महिला -पुरुष नागरिकांनी लाभ घ्यावा असे आहावान  ब्रह्मकुमारी अकोला-वाशिमच्या तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कीर्ती नगर ,गांधी रोड, जुने शहर ,मलकापूर ,गोरक्षण शाखेच्या समस्त ब्रह्माकुमारी व ब्रह्मकुमार यांनी केले . 
 
 


गीता जयंती - 9 डिसेंबर रोजी शहरात शान्ति अनुभूति शोभायात्रा :
 

 
 
अकोला -  श्रीमद्भगवत गीतेचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करणारे ‘जीवन का आधार, गीता का सार’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन शहरात दि. 10 ते 12 डिसेंबर, 2016 दरम्यान होत आहे. शहरात प्रथमच माऊंट आबूहून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आध्यात्मिक वक्ता राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषा बहनजी यांचे शुभागमन होत असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने शान्ति अनुभूति शोभायात्रा काढण्यात येणार आहे
 
 
सर्वशास्रशिरोमणी श्रीमद भगवद गीता जयंती 9 डिसेंबर रोजी सर्व जगात साजरी होणार आहे. याचे औचित्य साधुन आपल्या अमोघवाणीने गीतेचे सुगमरितीने निरूपण करणा­या, आंतरराष्ट्रीय गीता वक्त्या राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषादीदीजी यांचे पवित्र आगमन या दिवशी शहरात होईल. गीताजयंतीचे औचित्य साधून त्यांची शहरात शान्ति अनुभूति साठी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. 
 
शान्ति अनुभूति यात्रेचे आकर्षण राजयोगीनी ब्रह्माकुमारी उषादीदी हे असून फुलांनी सुशोभीत खुल्या बग्गीत त्या विराजमान असतील. शहरातील मध्यवर्ती मार्गाने नागरीकांना दर्शन देऊन त्या लाभान्वित करणार आहेत. शान्ति अनुभूति यात्रेत मंगल कलशधारी माता, भगीनी यांच्याबरोबर, श्वेत वस्रधारी ब्रह्माकुमारी परीवाराचे सदस्य, अनुशासन आणि स्वयंशिस्तीत नागरीकांना शांतीची अनुभूति करवून देतील. ठिकठिकाणी मान्यवरांच्याद्वारे आदरणीया उषादीदींचा सन्मान होऊन त्या मान्यवरांना आर्शीवचनही देणार आहेत. 
 
शान्ति अनुभूति यात्रेचा मार्ग -
 अनुभूति यात्रेचा प्रारंभ कार्यक्रमाच्या आयोजन ठिकाणापासून सुरुवात होईल.  या यात्रचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते होईल यात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे - शुभारंभ - आर जी डी ग्राऊंड होऊन पुढे - अशोक वाटिका - सिव्हील हॉस्पिटल - कलेक्टर ऑफिस चौक - पंयाचत समिती - तहसील कार्यालय - महानगरपालिका - गांधी चौक - ओपन थिएटर  - बस स्टॅण्ड - हेड पोस्ट ऑफिस - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - सिव्हील लाईन रोड - सिव्हील लाईन पोलिस स्टेशन - आकाशवाणी - समारोप आर.जी.डी. महाविदयालय ग्राऊंड येथे होईल.

म्हसावद

म्हसावद  21 से 23 जनवरी, 2015

धरणगाव

धरणगाव  27 से 29 जनवरी, 2015

अमलनेर

अमलनेर  27 सं 29 जनवरी, 2015

जलगांव

24 से 26 जनवरी, 2015

नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन