लाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |
मराठी लेख
फुलपाखरू व मुंगी
एकदा एका मुंगीने कोशातून बाहेर पडण्यासाठी हालचाल करणाऱ्या एका किड्याला पाहिले व ती म्हणाली, "अरेरे! काय ही याची अवस्था? या तुरुंगात याला आयुष्य काढावे लागतंय. याउलट मी किती नशीबवान आहे. मला मनाप्रमाणे हिंडता फिरता येते.' काही दिवसांनी मुंगीने त्या कोशाकडे पाहिले तर कोश रिकामा दिसला. ती विचार करू लागली की, "बिचारा किडा कुठे गेला असेल देव जाणे?' ती असे म्हणते न म्हणते तोच एक सुंदर फुलपाखरू तिच्याजवळ आले व तिला म्हणाले, "काय? मुंगीमावशी मीच तो किडा. आता माझं सुंदर, फुलपाखरू झाले आहे. मी मनसोक्त या फुलावरून त्या फुलावर उडतो. पहा मी तुझ्यापेक्षाही नशीबवान आहेे'. फुलपाखराचे शब्द ऐकून मुंगीची वाचाच बंद झाली.
तात्पर्य : दुसऱ्याबद्दल मते व्यक्त करण्यापूर्वी खरी परिस्थिती जाणून घ्यावी. नाहीतर तोंडघशी पडण्याची वेळ येते.
एकदा एक सिंह बैलाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता. बैल आपला जीव वाचवण्यासाठी जोरात धावत होता. इतक्यात त्याला एक गुहा दिसली. बैल गुहेत शिरला. तेथे एक कोल्हा आराम करत होता. तो बैलावर खेकसला..."अरे बैला, असा न विचारता कोणाच्याही घरात काय घुसतोय? चल नीघ इथून' असे म्हणून त्याला वाटेल ते बोलू लागला. बैल मात्र शांतपणे म्हणाला, "अरे क्षुद्र कोल्ह्या, तू मला काहीही बोललास तरी मी ते निमूटपणे सहन करीन. थोडा वेळ थांब. एकदा का तो सिंह निघून गेला की मग मी निर्धास्त होईन.तेव्हा माझी ताकद दाखवीन.
तात्पर्य : संकटकाळ संपेपर्यंत बलवानालाही क्षुद्रापुढे नम्र व्हावे लागते.
खरे स्वातंत्र्य - ब्र.कु. नलिनी, पुणे
स्वभावत: मनुष्य हा स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. तो स्वतंत्रता देवीचा उपासक आहे. स्वातंत्र्यप्रिय जीवनाचा उपासक आहे. कोणत्याही प्रकारचे बंधन पत्कारायला तो तयार नसतो. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मुक्ज जीवनाचा आनंद लुटावयास वाटतो. त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. प्राकृतिक बंधन सुटाक्षणीच मनुष्यात्मा मुक्तीच्या प्रवासाची वाटचाल करु लागतो. स्वातंत्र्याच्या अपूर्व अनुभवाचा रस प्राशन करण्यासाठी आज तो रावणराज्याच्या सोनेरी पिंजयात भाकरी मोठ¬ाकष्टाने खात आहे नव्हे पोटात ढकलत आहे. त्याचे अशांतीचे, दु:खाचे अश्रू थिजून गेले आहेत. बंधनाचा हिसका आणि दु:खाचा धसका घेतल्याने स्वातंत्र्यप्राप्ती त्याला आवाक्याबाहेरची वाटते.
स्वातंत्र्याची अपेक्षा करणे म्हणजे आत्मबलिदानाची तयारी ठेवणे, अज्ञानाची, अशुद्ध विचारांची, गैरसमजुतीची बंधने झुगारून देणे, आसुरी आणि दैवी संप्रदायांच्या संघर्षात दैवी संप्रदायाच्या बाजूने निर्भिडपणे उभे राहणे. कवडीतुल्य जीवन हिरेतुल्य बनविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, विषय विकारांनी बरबटलेल्या दृष्टिवृत्तीची होळी करणे. आपल्या देशाचा इतिहास या गोष्टीला साक्षी आहे. इतिहासाची गती चक्राकार असते. या चक्रात आपण बांधले गेलो मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रप्रेमींनी, वीरांगनानंनी, वीरबालकांनी हालअपेष्टा सोसल्या, छातीवर गोळ्या झेलल्या. प्राणर्पण करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. परंतु मातृभूमीची दास्यत्वातून सुटका झाल्यावर, नव्यानवलाईचे दिवस सरल्यावर आज काय स्थिती आहे, हे सर्वांना आज ठाऊक आहे. परकीय राज्यकर्ते निघून गेले असले तरी सारासार विचार नष्ट झाल्याने पाच मनोविकाररूपी रावणाची सत्ता आपण झुगारून टाकू शकलो नाही. त्यामुळे देहाभिमानाचा कटु वृक्ष कलियुगी फसव्या आकर्षणांच्या शाखांनी दिवसेंदिवस झपाट¬ाने फोफावत आहे. वरवर पाहता सुखद वाटणारी रावणाने दिलेली फळे अंती दु:ख देणारी असली तरी ती आपण आनंदाने चाखत आहोत. आरोपी कोर्टात थोडावेळ पिंजयात उभा राहतो. परंतु आपण सोन्याचा मुलामा दिलेल्या विकारांच्या पिंजयात जन्मोजन्मी अडकलो आहोत. धर्म, जात, पंथ, संप्रदायांच्या अन्याय, अयोग्य बंधनाविरूध्य लढा उभारून ती तोडून टाकरणे कठीण आहे, परंतु मी आणि माझे चे सूक्ष्म बंधन तोडून टाकता येत नाही हा अनुभव आहे. सत्ययुग-त्रेतायुगात आपण स्वस्वरुपात राहत असल्यामुळे जीवनमुक्ती अनुभवतो. परंतु द्वापारयुगात आपली अवस्था जटायू पक्षाप्रमाणे होते. परंतु शेवटच्या क्षणी जटायू आणि रामाची भेट झाली व जटायूच्या जीवनाचे सार्थक झाले. तो जीवनमुक्त झालाञ आपण मात्र अद्याप विकारांच्या बंधनात आहोतञ
मी व माझे च्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिवपिता आपल्याला ई·ारीय ज्ञान देऊन राजयोग शिकवित आहे. दु:खी करणाया व आत्मस्वातंत्र्य हिरावून घेणाया मनोविकारांचे दान मागत आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शिवपरमात्म्याला मनोविकारांचे दान देऊन त्याची शिकवण आचरणात आणण्याचा दृढ संकल्प करुया.