प्रशिक्षणाचे वेगळेपण (वैशिष्ट्ये)


 


प्रत्येक सहभागीस अभ्यास साहित्य (Study Materials)  पुस्तक स्वरूपात मिळेल.


साधारणत: प्रशिक्षण घेतल्यानंतर सहभागीस पुढील अभ्यासासाठी कुठलेही साहित्य मिळत नाही त्यामुळे प्रशिक्षणानंतर घरी गेल्यावर त्यांना अभ्यास साहित्य नसल्याने प्रात्यक्षिक करतांना अडचणी निर्माण होतात, ही गैरसोय टाळावी म्हणून प्रत्येक सहभागीस प्रशिक्षण-प्रात्यक्षिकांवर आधारित पुस्तके देण्यात येतील, त्यात खालील मुद्यांचा समावेश असेल.


1. बातमी लेखन (मुद्रित माध्यम) 2. रेडिओ पत्रकारीता 3. दूरचित्रवाणी (टिव्ही) पत्रकारिता 4. सायबर मीडिया, फोटो जर्नालिझम 5. मीडिया सेवा मार्गदर्शिका (या पुस्तकांमध्ये पिं्रट, इलेक्ट्रॉनिक, सायबर मीडिया मधील बातमी लेखन, वृत्तलेख, फिचर्स रायटींग, लेख, मुलाखत, जाहिरात, टिव्ही, रेडिओ वार्तापत्र, प्रक्षेपण, अँकरींग, वेब कास्टिग, वेब जर्नालिझम आदि बाबत प्रात्यक्षिकांसह माहिती मिळेल थोडक्यात एक परिपूर्ण पत्रकार बनण्यासाठी हे पुस्तक सहाय्य होऊ शकेल.)


 

वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग -


कुठलेही प्रशिक्षण घेण्याचा उद्देश प्रात्यक्षिक, ज्ञान वृध्दिगत होण्याचा असतो. या उद्देशाने प्रेरित होऊनच या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. दिवसातील प्रत्येक तासाचे वेळापत्रक आणि विषय अगोदरच जाहिर झालेला असून वक्ता अवांतर चर्चा न करता केवळ त्याचाच विषयावर बोलणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींचा वेळ वाया जाणार नसून प्रात्यक्षिक आणि अनुभवयुक्त प्रशिक्षण त्यांना मिळेल याची पुरेपूर काळजी आयोजकांनी घेतलेली आहे.


 

 

 तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक :


या प्रशिक्षणासाठी पत्रकारिता, टिव्ही, रेडिओ, सायबर मीडिया या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पत्रकारिता शिक्षित अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. जे ईश्वरीय ज्ञान साधनेबरोबर पत्रकारिता विषयात दिग्गज आहेत त्याच बरोबर पत्रकारिता ज्यांनी प्रत्यक्ष जीवनात उतरवलेली आहे अशाच तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. 


 
Click for more 
 Home