प्रशिक्षण स्थान : अनुभूती इंटरनॅशनल स्कूल निवासी प्रशिक्षण केंद्र, जळगाव

 जैन उद्योग समूह या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय कंपनीने जळगाव येथून 10 किलोमिटर अंतरावर अनुभूती इंटरनॅशन स्कूल या गुरूकूल पध्दतीच्या शैक्षणिक व निसर्गरम्य वास्तूची निर्मिती केलेली आहे. सुंदर कारंजे, विविध हरीत फल-फुल वृक्ष, बगीच्यांच्या प्राकृतिक सौंदर्याने नटलेला या परिसरात गुरूकूल पध्दतीने मुलांना शिक्षण दिले जाते. तसेच या ठिकाणी संमेलन, कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन केले जाते. सदरहू परिसर आबू पर्वतावरील ज्ञानसरोवर अॅकेडमीची आठवण करुन देतो. भव्य प्रशिक्षण सभागृह, सुसज्य आवास-निवास व्यवस्था, आधुनिक स्वयंपाक गृह आदिंची उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भंवरलाल भाऊ जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ठिकाणी ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय मीडिया संमेलनाचे यशस्वी आयोजन या पूर्वी करण्यात आलेले आहे. 
 

 
Click for more 
 Home