प्रशिक्षण निवड पध्दत :

1. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून 250 भाई/बहिणींची निवड करण्यात येईल. महाराष्ट्रातील सेवाकेंद्र / उपसेवाकेंद्राची संख्या पाहता ही संख्या अत्यंत कमी आहे. परंतु गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणासाठी संख्या ही कमीच असावी लागते हे धोरण मीडिया प्रभागाचे आहे.


2. प्रथम 150 भाई बहिणींची निवड प्रथम प्रवेश/नोंदणी प्रथम प्राध्यान्य या तत्वावर असेल. तरीही निवडीचा अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.

 
3. प्रथम 150 नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत 100 जणांची निवड आयोजक प्रशिक्षणाची उमेदवारास किती आवश्यकता आहे त्यावरुन ठरवतील.

 
4.प्रशिक्षणासाठी केवळ 250 व्यक्तिंची निवड केली जाणार असल्याने महाराष्ट्रातील सर्व सेवाकेंद्रांना प्रतिनिधीत्व/सहभागीत्व मिळावे या दृष्टीने प्रत्येक सेवाकेंद्राच्या एक / दोन भाई-बहिणींची निवड करण्यात येणार आहे. तेव्हा आपण आपल्या सेवाकेंद्राच्या माध्यमातून ज्यांना प्रशिक्षणासाठी पाठविणार आहोत अशा दोेन व्यक्तिंची नावे नामनिर्देशित करावी. जर आपणाकडे सहभागी होऊ इच्छिणा­यांची संख्या दोना पेक्षा जास्त असेल तर मात्र सदरहू नावे स्वतंत्र नमूद करावीत. रजिष्ट्रेशन वर्ड फाईल मध्ये टाईप करुन पाठवावेत. (नमुना सोबत जोडलेला आहे) प्राप्त नावांची छाननी होऊन निवड झालेल्यांना व त्यांच्या सेवाकेंद्र संचालिका बहिणींना स्वतंत्र ईमेल / एसएमएसने कळविण्यात येईल. त्यानंतरच त्यांचा प्रशिक्षणासाठी प्रवेश अंतिम समजण्यात येईल.

  
Click for more 
 
 
 Home