प्रशिक्षणाचा उद्देश्य :

1. ज्यांना शास्त्रशुध्द आणि सविस्तर पत्रकारितेचे शिक्षण हवे आहे, ज्यांना विविधअंगी बातम्या बनविणे, प्रभावी लेखन, फिचर्स, स्तंभलेख (Column Writing), टिव्ही, रेडिओ, फिल्म, डॉक्युमेंटरीसाठी स्क्रीप्ट लेखन, टिव्ही अँकरींग, रेडिओ जॉकी, ब्रॉडकास्टींग, वेब / ब्लॉग / सायबर जर्नालिझम करणे मनापासून शिकायचे आहे त्यांच्यासाठी एक परिपूर्ण प्रात्यक्षिकयुक्त पत्रकारिता/मीडिया प्रशिक्षण मिळावे हा प्रथम उद्देश आयोजनामागील आहे.
2. प्रत्येक सेवाकेंद्रात किमान दोन भाई / बहिणी मीडिया सेवेसाठी असावे ज्यांना मीडियाच्या तीन्ही अंगाचे (पिं्रट,इलेक्ट्रॉनिक व सायबर) प्रॅक्टीकल ज्ञान मिळावे जेणे करुन मीडिया सेवा प्रभावी आणि परिणामकारक व्हावी. दुस­या शब्दात प्रत्येक सेवाकेंद्रावर किमान एक-दोन निष्णात पत्रकार / मीडिया तज्ज्ञ असावेत हा प्रामाणिक उद्देश या प्रशिक्षणाचा आहे.
3. ‘मीडिया सेवा करणे’ आणि ‘पत्रकारिता प्रशिक्षण घेऊन मीडिया सेवा’ करणे यात फरक आहे. केवळ बातमी छापून येणे म्हणजे मीडिया सेवा झाली असे नाही. साधी सरळ बातमी प्रकाशित करुन आपण वाचकांना केवळ माहिती देऊ पण पत्रकारितेच्या अंगाने तीच बातमी वेगळया पध्दतीने मांडल्यास वाचक, प्रेक्षक, श्रोत्यांना वेगळेपण जाणवेल व आपल्या कार्यक्रम घेण्याचा उद्देश सफल होईल असे वाचक पुढे ईश्वरीय ज्ञान घेण्यासाठी सेवाकेंद्रात निश्चित येतील. थोडक्यात प्रशिक्षित मीडिया तज्ज्ञांनी केलेली बातमी प्रभावी आणि परिणामकारक (Result oriented)  अशी असते, अश्याच बातमी लेखन करणारे पत्रकार यातून तयार व्हावे हा प्रामाणिक उद्देश्य या शिबिराचा आहे.
 
Click for more 
 Home