भूमिका :

माध्यमे (मीडिया) लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहेे. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर मीडियाचा पाया पत्रकारिता हाच आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या कक्षा विस्तारीत होत असतांना पत्रकारितेमध्ये नवीन प्रवाह येत आहेत. लेखणीची जागा कीबोर्ड आणि माऊसने कधी घेतली ते कळलेच नाही. या स्थित्यंतरात पत्रकारितेचे मूळ उद्देश आम्ही विसरत चाललो काय? असे प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. या मूल्यांना पुन्हा पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून माध्यमांमध्ये मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी मीडिया प्रभाग स्थापित झालेला आहे.
ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाचे अद्वितीय कार्य सर्वश्रृत आहे. ईश्वरीय कार्यात मीडिया सेवेचे महत्व आम्ही जाणतोच. या वर्गाची सेवा करणे म्हणजे परमात्म प्रत्यक्षतेसाठी थेट मदत करणेच होय. अशा महत्वपूर्ण मीडिया सेवेसाठी महाराष्ट्र राज्यस्तर पत्रकारिता प्रशिक्षण (मीडिया ट्रेनिंग) आयोजित करण्यात आले आहे.
 

Click for more 

 Home